Monday, December 30, 2013

9:06 PM

'सुरतवर अणुबॉम्ब टाकणार होतो!'


'सुरतवर अणुबॉम्ब टाकणार होतो!'

Yasin

अणुबॉम्बसारखे महासंहारक अस्त्र दहशतवाद्यांच्या हाती लागले तर...? नुसत्या कल्पनेनेही थरकाप उडेल असा हा प्रश्न. गेल्या कित्येक दिवसांपासून जगाला छळणारी ही भीती खरी ठरण्याचे संकेत राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मिळाले आहेत. कारण इंडियन मुजाहिदीनने गुजरातमधील सुरत शहरावर अणुबॉम्ब टाकण्याचा प्लान आखला होता, अशी हादरवून टाकणारी माहिती भारताच्या ताब्यातील दहशतवादी यासिन भटकळने दिली आहे.

इंडियन मुजाहिदीनचा प्रमुख असलेल्या अहमद जरार सिद्दिबाप्पा उर्फ यासिन भटकळ याला ऑगस्ट महिन्यात नेपाळमधून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून एनआयए, आयबी व विविध राज्यांच्या पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. या चौकशीतूनच अणुबॉम्बचा हा कट उघड झाल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

टाइम्सच्या वृत्तानुसार, यासिनने पाकिस्तानातील आपला बॉस रियाझ भटकळ यांच्याशी फोनवर संपर्क करून अणुबॉम्बची व्यवस्था करण्यास सांगितले होते. रियाझने तशी तयारी दाखवली होती. तसेच सुरतवर अणुबॉम्ब टाकण्याबाबत त्यांच्यात एकमतही झाले होते. मात्र, आयबीने यासिनला अटक केल्यामुळे हा कट उधळला गेला. असे असले तरी अणुबॉम्बपर्यंत दहशतवाद्यांचे हात पोहोचले असल्याचे यावरून स्पष्ट झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे.

यासिन रियाझमधील फोन संभाषण

यासिन: भाईजान... एखाद्या छोट्या अणुबॉम्बची व्यवस्था करता येईल का?

रियाझ: नक्कीच करता येईल. पाकिस्तानाच कुठल्याही गोष्टीची व्यवस्था होऊ शकते.

यासिन: सुरत शहर उडवता येईल, असा अणुबॉम्ब मला हवा आहे.

रियाझ: पण त्यात मुसलमानही मारले जातील.

यासिन: हल्ल्याच्या आधी आपण मशिदीत पोस्टर लावू आणि मुसलमान लोकांना गुपचूप शहर सोडण्याच्या सूचना देऊ. 

sterra