Tuesday, December 23, 2014

Mallika shy when Ompuri's bold scence

बॉलिवूडच्या चित्रपटांतील 'बोल्ड सीन्स'चा उल्लेख करायचा झाल्यास मल्लिका शेरावतचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. यापूर्वी अनेक चित्रपटांतून अंगप्रदर्शनाचे नवे मापदंड निर्माण करणाऱ्या मल्लिकाने 'डर्टी पॉलिटिक्स' या चित्रपटात मात्र ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्याबरोबर बोल्ड सीन्स करताना अवघडल्यासारखे झाल्याचे सांगून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 'डर्टी पॉलिटिक्स' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत तिने चित्रीकरणावेळीचे आपले अनुभव सांगितले. यावेळी पत्रकारांनी या चित्रपटात ओम पुरी यांच्याबरोबर बोल्ड सीन्स करतानाच्या अनुभवाविषयी विचारले असता, मला त्यांच्यासोबत असे सीन्स करताना नेहमीच अवघडल्यासारखे होत असे, मात्र त्यांनी प्रत्येकवेळी मला सांभाळून घेतल्याचे सांगितले. अशा सीन्समध्ये ओम पुरी यांनी माझे अवघडलेपण दूर करण्यासाठी मदत केल्याचे मल्लिकाने सांगितले.
भनवारी देवी सेक्स स्कँडलवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन के.सी. बोकाडिया यांनी केले असून, ओम पुरी या चित्रपटात एका राजकारण्याची भूमिका साकारत आहेत. तर मल्लिका शेरावतने 'डर्टी पॉलिटिक्स'मध्ये आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्वत:च्या मादक सौदर्यांचा वापर करणाऱ्या एका महत्वाकांक्षी स्त्रीची भूमिका रंगवली आहे.
ompuri-mallika

No comments:

Post a Comment

sterra