Actors who goes beyond cosmetic surgery for roles



PHOTOS : जाणून घ्या, किती मेहनत घेऊन पडद्यावर अवतरतात तुमचे आवडते कलाकार

एक काळ असा होता, की आपल्या चपट्या नाकामुळे शिल्पा शेट्टी काळजीत पडली होती. यासाठी तिने प्लास्टिक सर्जरीची मदत घेतली आणि तिची नाकावरील शस्त्रक्रिया मीडियात चर्चेचा विषयी ठरली. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंतचे कलाकार आपल्या भूमिकेच्या अनुरुप स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करताना दिसता.

अलीकडेच रिलीज झालेल्या 'भाग मिल्खा भाग' या सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकलेल्या अभिनेता फरहान अख्तरच्या सिक्स पॅक अ‍ॅब्सची चर्चा सगळ्यांच्या ओठांवर आहे. हे सिक्स पॅक फरहानला सहजासहजी मिळालेले नाहीत. यासाठी फरहानला बराच घाम गाळावा लागले आहे. तसे पाहता भूमिकेसाठी आपल्या शरीरयष्ठीबरोबरच भाषेवर बरीच मेहनत घेणारा फरहान बी टाऊनचा एकमेव अभिनेता नाहीये.  प्रियांका चोप्रा, सैफ अली खान, ऋतिक रोशन, शाहरुख खानसुद्धा या यादीत आहेत.

फरहान अख्तरने मिल्खा सिंहची भूमिका पडद्यावर जिवंत करण्यासाठी तब्बल अठरा महिने जीममध्ये वर्कआऊट केलं. फ्लाईंग शिखप्रमाणे दिसण्यासाठी त्याने आपले केस आणि दाढीसुद्धा वाढवली. सिनेमाच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून तो एखाद्या खेळाडूप्रमाणे जगला. पंजाबी भाषेसाठी त्याने गुलजार यांच्याकडून खास प्रशिक्षण घेतले. पंजाबीबरोबरच भाषेला उर्दु टच देण्यासाठी त्याने त्याचे वडील फरहान अख्तरकडून भाषेचे धडे गिरवले. इतकेच नाही तर भूमिकेसाठी बरेच वजनही वाढवले. फरहानने फिटनेस ट्रेनर समीर जौरा यांच्याकडून आपले शेड्युल तयार करुन घेतले. तसे पाहता वाढलेल्या वजनामुळे फरहानला ब-याच अडचणीदेखील आल्या. सेनेत दाखल होणारा तरुण दिसण्यासाठी फरहानला वाढलेले वजन पंधरा किलोपर्यंत कमीसुद्धा करावे लागले.

PHOTOS : जाणून घ्या, किती मेहनत घेऊन पडद्यावर अवतरतात तुमचे आवडते कलाकार

प्रियांका चोप्रासुद्धा वर्कआऊटमध्ये गाळते घाम

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा बॉक्सर मेरी कोमच्या भूमिकेत लवकरच मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. यासाठी ती अलीकडेच मेरी कोमच्या इंफाल या गावी जाऊन आली. तिथे जाऊन प्रियांकाने मेरी कोमच्या कुटुंबीयांची आणि गावक-यांची भेट घेतली. तेथून परतल्यानतंर तिने ट्विट केले, की मोठ्या कष्टानंतर कुणी चॅम्पिअन बनतं.
म्हणजेच या भूमिकेसाठी आपल्यालाही मोठे कष्ट आणि मेहनत घ्यावी लागणार आहे, हे प्रियांका कळून चुकले आहे. बॉक्सर मेरी कोमवर आधारित सिनेमात प्रियांकाला तिच्यासारखा लूक देण्यासाठी संजय लीला भन्साळी यांनी हॉलिवूडचे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मार्क गारबरीनो यांना आमंत्रित केले आहे. याशिवाय ट्रेनर समीर जौरा प्रियांकाला बॉक्सरसारखा लूक देण्यासाठी तिच्याकडून वर्कआऊट करुन घेत आहेत.



 PHOTOS : जाणून घ्या, किती मेहनत घेऊन पडद्यावर अवतरतात तुमचे आवडते कलाकार



'बुलेट राजा'साठी सैफ घेतोय मेहनत

आपल्या आगामी 'बुलटे राजा' या सिनेमातील भूमिकेत 'ओमकारा'तील लंगडा त्यागीची छाप दिसू नये, हे आव्हान अभिनेता सैफ अली खानला पेलावे लागले आहे. 'ओमकारा' सिनेमातील लंगडा त्यागीच्या भूमिकेत बुंदेलखंडी टच होता. तर 'बुलेट राजा' सिनेमातील सैफची भूमिका उत्तर प्रदेशातील कस्बाई समाजाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. सैफने मेकअप करण्याऐवजी तासन् तास उन्हात उभे राहून स्वतःचा रंग सावळा करुन घेतला. शिवाय उत्तर प्रदेशातील गँगस्टरप्रमाणे त्याने आपले केससुद्धा वाढवले.

PHOTOS : जाणून घ्या, किती मेहनत घेऊन पडद्यावर अवतरतात तुमचे आवडते कलाकार

'सत्याग्रह'साठी आंतरराष्ट्रीय पत्रकार बनली करीना कपूर

आगामी 'सत्याग्रह' या सिनेमात करीना कपूरने इंरनॅशनल जर्नलिस्ट यास्मीनची भूमिका साकारली आहे. असे म्हटले जाते, की करीनाची भूमिकेसाठी सीएनएनच्या न्यूज अँकर क्रिस्टीन ऐमॅनपोर यांच्यापासून प्रेरणा घेण्यात आली आहे. शिवाय या भूमिकेसाठी करीनाने पत्रकारांशी संवादही साधला.

PHOTOS : जाणून घ्या, किती मेहनत घेऊन पडद्यावर अवतरतात तुमचे आवडते कलाकार
'बॉम्बे वेलवेट' या सिनेमात करण जोहर पेलणार अभिनयाचे शिवधनुष्य

अनुराग कश्यप यांच्या 'बॉम्बे वेलवेट' या रोमँटिक थ्रिलर सिनेमात निर्माता-दिग्दर्शक करण जोहरसुद्धा बरीच मेहनत घेतोय. या सिनेमात करण चक्क व्हिलनच्या भूमिकेत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. करणने साकारलेला व्हिलन बिझनेसमन आहे. श्रीमंत बिझनेसमन दिसण्यासाठी करणने बारा किलो वजन वाढवले आहे. यासाठी त्याने फिटनेस ट्रेनर क्रिस गेथिनची मदत घेतली आहे. क्रिस गेथिन अभिनेता ऋतिक रोशनचा फिटनेस ट्रेनर आहे.

PHOTOS : जाणून घ्या, किती मेहनत घेऊन पडद्यावर अवतरतात तुमचे आवडते कलाकार

अभिनेत्री - मेरिल स्ट्रीप
सिनेमा - म्युझिक ऑफ द हार्ट


1999 साली रिलीज झालेल्या 'म्युझिक ऑफ द हार्ट' या सिनेमासाठी अभिनेत्री मेरिल स्ट्रीपने व्हायोलिन वाजवणे शिकले होते. या सिनेमात मेरिल व्हायलिन शिक्षिकेच्या भूमिकेत होती. या भूमिकेसाठी मेरिलने चार आठवडे दररोज सहा तास व्हायोलिन वाजण्याचा रियाज केला.

PHOTOS : जाणून घ्या, किती मेहनत घेऊन पडद्यावर अवतरतात तुमचे आवडते कलाकार

अभिनेता - डेनियल डे लिवस
सिनेमा - माय लेफ्ट फुट

1989 साली रिलीज झालेल्या 'माय लेफ्ट फुट' या सिनेमात डेनियलने पॅरालाईज्ड व्यक्तिची भूमिका साकारली होती. आजारी व्यक्तिच्या भूमिकेत एकरुप झालेले डेनियल शॉट ओके झाल्यानंतरसुद्धा व्हिल चेअरवरुन उतरले नव्हते.
 
PHOTOS : जाणून घ्या, किती मेहनत घेऊन पडद्यावर अवतरतात तुमचे आवडते कलाकार 
अभिनेता - सीन पेन्
सिनेमा - स्‍वीट अँड लोडाउन


1999 साली रिलीज झालेल्या 'स्वीट अँड लोडाउन' या सिनेमात सीन यांनी गिटार वाजवणा-या तरुणाची भूमिका साकारली होती. यासाठी त्यांनी गिटार वाजवण्याचे प्रशिक्षण घेतले होते.
 
PHOTOS : जाणून घ्या, किती मेहनत घेऊन पडद्यावर अवतरतात तुमचे आवडते कलाकार 
 
अभिनेता - रॉबर्ट डे नीरो
सिनेमा- टॅक्‍सी ड्राइवर

1976 साली रिलीज झालेल्या 'टॅक्सी ड्रायव्हर' या सिनेमात रॉबर्ट डे नीरो यांनी टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली होती. यासाठी त्यांनी एक महिना टॅक्सी चालवली होती. ते दररोज बारा तास टॅक्सी चालवायचे.
 
PHOTOS : जाणून घ्या, किती मेहनत घेऊन पडद्यावर अवतरतात तुमचे आवडते कलाकार 
अभिनेता - क्रि‍स्‍टीन बेल
सिनेमा - द मॅकेनि‍स्‍ट


2004 साली रिलीज झालेल्या 'द मॅकेनिस्ट' या भूमिकेसाठी अभिनेता क्रिस्टीन बेल बरेच दिवस उपाशी राहिले होते. चार महिने त्यांनी केवळ कॉफी घेतली आणि दररोज एक सफरचंद खाल्ला. त्यांनी या सिनेमासाठी अशाप्रकारे आपले वजन कमी केले होते.
 

























No comments:

Post a Comment