Sunday, July 21, 2013

Boollywood celebrities who dont have kids


PHOTOS : बी टाऊनच्या या सेलिब्रिटींनी लग्न केले, मात्र बाळाला जन्म दिला नाही !

हे आहेत बॉलिवूडमधील असे कलाकार ज्यांनी लग्न केले, मात्र बाळाला जन्म दिला नाही. या सर्व कलाकारांची यामागची कारणं वेगवेगळी आहेत. काही सेलिब्रिटी कपल एकमेकांबरोबरच इतके आनंदी आहेत की त्यांना कधी बाळाचा विचारच पडला नाही. तर काहींनी प्रयत्न केले, मात्र त्यांना आयुष्यात आईवडील होण्याचा आनंद मिळू शकला नाही. मात्र तरीदेखील त्यांचे नाते तेवढेच अतूट राहिले. प्रत्येक सुख-दुःखात त्यांनी एकमेकांना साथ दिली. 

PHOTOS : बी टाऊनच्या या सेलिब्रिटींनी लग्न केले, मात्र बाळाला जन्म दिला नाही !


बॉलिवूडचे दिग्गज सेलिब्रिटी कपल असलेले दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे लग्न 1966 साली झाले होते. या दोघांना एकही मुलं नाहीये, मात्र त्यांचे नाते एक आदर्श नाते ठरले आहे. दोघांनी लग्नानंतर आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार बघितले. मात्र तरीदेखील त्यांचे एकमेकांवरचे प्रेम कमी झाले नाही. सायरा बानो दिलीप कुमार यांच्यापेक्षा वयाने 22 वर्षे लहान आहे. सायरा बानो यांच्या मते दिलीप कुमार यांना सांभाळणे म्हणजे 10 मुलांना सांभाळण्यासारखे आहे. त्यामुळे मुलं नसल्याचे दुःख होत नसल्याचे त्या म्हणतात.

PHOTOS : बी टाऊनच्या या सेलिब्रिटींनी लग्न केले, मात्र बाळाला जन्म दिला नाही !

शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या लग्नाला 28 वर्षे झाली आहेत. या दोघांचे एकही मुल नाहीये. या दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे. हे सेलिब्रिटी कपल एकमेकांच्या विचाराचा सन्मान करतात. जावेद अख्तर यांना त्यांची पहिली पत्नी हनी ईरानीपासून दोन मुले आहेत. जोया आणि फरहान अख्तर. हे दोघेही शबाना आझमी यांच्या आयुष्यात मुलांची कमतरता दूर करतात.

PHOTOS : बी टाऊनच्या या सेलिब्रिटींनी लग्न केले, मात्र बाळाला जन्म दिला नाही !

अभिनेता अनुपम खेर आणि अभिनेत्री किरण खेर यांची पहिली भेट चंदीगढमध्ये झाली होती. सुरुवातील हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनले. 1985 साली या दोघांनी आपल्या मैत्रीचे रुपांतर लग्नात केले. अनुपम खेर यांच्याशी लग्नगाठीत अडकण्यापूर्वी किरण खेर विवाहित होत्या. शिवाय त्यांना एक मुलगासुद्धा होता. मात्र पहिल्या पतीबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी अनुपम खेर यांच्याशी लग्न केले.

PHOTOS : बी टाऊनच्या या सेलिब्रिटींनी लग्न केले, मात्र बाळाला जन्म दिला नाही !


बॉलिवूडमध्ये ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणा-या मीना कुमारी यांनी त्यांच्यापेक्षा वयाने 15 वर्षे मोठे असलेल्या दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याबरोबर लग्न केले होते. कमाल अमरोही यांचे मीना कुमारीबरोबरचे हे दुसरे लग्न होते. त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा होता. त्यामुळे त्यांना मीना कुमारी यांच्यापासून मुलं नको होते. लग्नाच्या काही वर्षांनी मीना कुमारी यांनी कमाल अमरोही यांच्यापासून घटस्फोट घेतला होता.

PHOTOS : बी टाऊनच्या या सेलिब्रिटींनी लग्न केले, मात्र बाळाला जन्म दिला नाही !

अलीकडेच करीना कपूरने आपल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, तिला बाळ नकोय. तिने म्हटले होते की, ती आता केवळ 32 वर्षांची आहे. शिवाय सैफला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत.

No comments:

Post a Comment

sterra