Mamata Kulkarni has taken sanyas, and her first love is Ishwar
अनेक वर्षांपासून बॉलिवूडमधुन बेपत्ता झालेली मराठमोळी ममता कुलकर्णी अभिनेत्री काही दिवसांपूर्वी अचानक चर्चेत आली होती. तिने इस्लाम धर्म स्विकारला असून ती नैरोबीत स्थायिक झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. परंतु, त्या सर्व बिनबुडाच्या बातम्या ठरल्या आहेत. ममता कुलकर्णीने सन्यास घेतला असून ती एक साध्वी झाली आहे. तिने तिच्या गुरुंवर एक पुस्तकही लिहीले आहे. हे सर्व तिनेच सांगितले
ममता कुलकर्णी गेल्या दशकापेक्षा जास्त कालवधीपासून पडद्यामागे गेली आहे. काही महिन्यांपूर्वी तिच्याबद्दल अचानक चर्चा सुरु झाली. ममता कुलकर्णी कुठे आहे, याचा शोध सुरु झाला. त्यानंतर तिच्याबद्दल वेगवेगळ्या बातम्या येऊ लागल्या. तिने इस्लाम स्विकारल्याच्या बातम्यांची संख्या जास्त होती. तिने ड्रग माफिया विक्की गोस्वामीसोबत लग्न केल्याचीही बातमी पसरली होती. परंतु, आता त्यावरुन पडदा उघडला आहे. ती प्रसारमाध्यमांसमोर आली आणि स्वतःबद्दल माहिती दिली. बॉलिवूडपासून अचानक दूर जाण्याच्या निर्णयाबाबत तिने सांगितले, काही जण जगाची कामे करण्यासाठी जन्म घेतात तर काही जण इश्वराची. मी इश्वराच्या कामांसाठी या जगात आले आहे.
बॉलिवूडमध्ये परतण्याची शक्यता तिने सपशेल फेटाळून लावली आहे. ज्याप्रमाणे तुपापासून पुन्हा दूध बनविता येत नाही, तसेच हे आहे. लग्नाबाबतही तिने स्पष्टीकरण दिले. ती म्हणाली, मी कोणाशीही लग्न केलेले नव्हते, आताही मी अविवाहितच आहे. मी विक्की गोस्वामीवर प्रेम करते. परंतु, आता माझे पहिले प्रेम इश्वरच आहे.
No comments:
Post a Comment