Tuesday, March 27, 2012

Grace...A Thoughtful Marathi Poet - Manik Godghate - Grace - Marathi Poet

Celebrated Marathi poet and author Manik Godghate, popularly known as ‘Grace,' passed away on Monday morning fighting cancer at the Dinanath Mangeshkar Hospital here. He was 75 years old.
Known for his path-breaking work in Marathi literature, Godghate, was a household name owing to his poetry that was used in many popular songs. Having many awards to his credit, he portrayed the apathy and sadness in human life.
He was awarded the Sahitya Akademi award for his prose Varyane halte raan (The forest swings with the wind) in 2011, which according to many of his readers should have come much earlier in his life. He was decorated with Vidarbha Bhushan in 2011.
His works include Churchbell and Mitva in prose, and Sandhyakalchya Kavita, Rajputra and Darling, Sanjbhayachay Saajani and Chandramadhaviche Pradesh in poetry.

Irreparable loss

Condolences poured in from all quarters. “He was indeed a person who gave a completely new turn to Marathi poetry. His loss is irreparable,” poet Mangesh Padgaonkar stated.
Singer Lata Mangeshkar described him as a “father figure” and a friend of the Mangeshkar family. “I feel fortunate that I have sung the song Bhay ithale sampat nahi (the fears here do not end) penned by him. After all, he fought cancer without any fear, but has left us today.”
Terming Grace a “great poet,” Dalit poet Namdev Dhasal said even Maharashtra had failed to recognise the true worth of the literary genius. Maharashtra Governor K. Sankaranarayanan said, “Poet Grace was a beautiful dream to have occurred to the world of Marathi literature and poetry.”




मराठी कवितेच्या दालनात स्वयंभूपणे गेली ४५ वर्षं अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ कवी माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस यांचं आज पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कर्करोगानं निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. ‘ दुःखाचा महाकवी ’ असं बिरुद मिरवणा-या कवी ग्रेस यांना गेल्याच महिन्यात अत्यंत मानाच्या साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. या महाकवीच्या ‘ ग्रेस ’ फूल एक्झिटमुळे साहित्यातील ‘ माणिक ’ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

कविता ही माझ्या आत्म्याची प्रतिष्ठा आहे, अशा शब्दांत आपल्या साहित्यसर्जनाचा उगम विशद करणारे कवी ग्रेस हे मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुस-या पिढीतील एक अग्रगण्य कवी... सन १९६७ मध्ये ' संध्याकाळच्या कविता ' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यानंतरची पुढची चार दशकं कविता व ललितलेखांच्या माध्यमातून त्यांच्या सृजनाचा झरा अखंड वाहत राहिला होता. राजपुत्र आणि डार्लिंग , चंद्रमाधवीचे प्रदेश , सांध्यपर्वातील वैष्णवी , सांजभयाच्या साजणी हे कवितासंग्रह ; चर्चबेल , मितवा , संध्यामग्न पुरुषाची लक्षणे , वा-याने हलते रान , मृगजळाचे बांधकाम , कावळे उडाले स्वामी हे ललितलेख संग्रह ही ग्रेस यांची मिळकत.

विलक्षण शब्दकळा , लोककथा , मिथककथा , पुराणकथा यांच्यातील घटकांचा प्रतिमांसाठी सढळ हाताने वापर , नादमयता , गेयता आणि त्यांच्या जोडीला भावव्याकूळता हे ग्रेस यांच्या साहित्याचे प्रमुख विशेष. त्यांच्या कवितेतील आशयगर्भ रचना आणि त्यातल्या अर्थानं साहित्यप्रेमींच्या काळजाचा ठाव घेतला, दर्दी रसिकांनी त्यांच्यावर अलोट प्रेम केलं. शब्दांचे माध्यम अत्यंत परिणामकारकपणे वापरूनही त्यांच्या कवितांतून काही वेळा मौनसदृश ; पण भावस्पर्शी दुर्बोधता जाणवली. या दुर्बोधतेचा आक्षेप त्यांच्या साहित्यावर सातत्याने घेतला गेला. मात्र , ' कर्णाची जशी कवचकुंडले... तशीच माझ्या कवितेची दुर्बोधता ' अशी भूमिका त्यांनी सातत्याने घेतली होती.

कवी ग्रेस यांना जशी रसिकांकडून दाद मिळाली, तसाच पुरस्कारांच्या रुपानंही त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. १९६८ मध्ये ‘ संध्याकाळच्या कविता ’ या त्यांच्या काव्यसंग्रहाला राज्य सरकारचं कवी केशवसूत पारितोषिक मिळालं होतं. कविवर्य केशवसूत स्मृती काव्य पुरस्कारानंही कवी ग्रेस यांना गौरवण्यात आलं होतं. मा. दीनानाथ पुरस्कार, प्रिय जी. ए. सन्मान, नागभूषण पुरस्कार, विदर्भ भूषण पुरस्काराचेही ते मानकरी ठरले होते. परंतु, या सर्वांवर कळस चढवला तो, यंदा जाहीर झालेल्या साहित्य अकादमी सन्मानानं. ' वा-याने हलते रान ' या त्यांच्या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करणा-या कवी ग्रेस यांनी, उशीर झाल्याबद्दल खंतही व्यक्त केली होती. युनिक फीचर्स आणि अनुभव मासिकानं भरवलेल्या दुस-या ई-साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही ग्रेस यांनी भूषवलं होतं.

कवी ग्रेस ब-याच काळापासून कर्करोगाशी शर्थीनं लढा देत होते. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या दरम्यान त्यांना डोक्यावरील केस गमवावे लागले होते. पण माझे केस पुन्हा वाढले की मी माझी आणि लिहिण्याची ताकद पुन्हा कमावेन, असं ते म्हणत. ‘ खेत जलने से फसल जादा आती है ' असं मिश्किलपणे सांगताना ग्रेस यांच्या चेह-यावर फुलणारं हसू आज कायमचं हरवलंय. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. याच हॉस्पिटलमध्ये ११ जानेवारीला ‘ ओल्या वेळूची बासरी ’ या त्यांच्या ललितबंध संग्रहाचं प्रकाशन झालं होतं. त्या दिवशी टाळ्यांच्या कडकडाटानं निनादून गेलेल्या दीनानाथ हॉस्पिटलमध्ये आज सन्नाटा पसरला आहे. दुःखाचा हा महाकवी आपल्या मित्रांना, चाहत्यांना दुःखसागरात लोटून जगाचा निरोप घेऊन निघून गेलाय. ग्रेस यांच्या निधनानं, साहित्यविश्वातील ‘ माणिक ’ मोती गळाल्याची भावना साहित्यवर्तुळात व्यक्त होतेय. 

No comments:

Post a Comment

sterra