‘मद्रास कॅफे’ला भाजपचा विरोध - Mandras Cafe - BJP
माजी पंतप्रधान राजीव गांधी
यांची हत्या घडवून आणणारा एलटीटीईचा प्रमुख प्रभाकरन याची व्यक्तिरेखा
नकारात्मक दाखविणाऱ्या 'मद्रास कॅफे' या आगामी सिनेमाला भाजपने विरोध
दर्शवला आहे. या चित्रपटावर तत्काळ बंदी घालण्याची मागणी भाजपने केली आहे.
अभिनेता जॉन अब्राहमची निर्मिती असलेला 'मद्रास कॅफे' हा चित्रपट भारताची गुप्तचर यंत्रण रिसर्च अँड अॅनालिसीस विंग (रॉ) च्या कार्यपद्धतीवर आधारीत आहे. श्रीलंकेतील १९९०ची अंतर्गत बंडाळी आणि त्यातील भारताची भूमिका हा चित्रपटाचा मुख्य विषय आहे. श्रीलंकेच्या हल्ल्यात मारला गेलेला प्रभाकरन यांची व्यक्तिरेखा यात नकारात्मक दाखविण्यात आली आहे. तसेच तामिळी संघटनांना उल्लेख चित्रपटात दहशतवादी असा करण्यात आल्यामुळे तामीळ संघटनांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. भाजपने तामिळींच्या भावनांची दखल घेत चित्रपटाला विरोध दर्शवला आहे.
'मद्रास कॅफे' हा चित्रपट उद्यापासून (शुक्रवार) प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. मुंबईत मोठ्या संख्येने तामिळी राहतात. त्यांचा विरोध असताना हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास सामाजिक तेढ निर्माण होईल. तामिळींच्या भावनांची दखल घेऊन चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे, अशी मागणी शेलार यांनी पत्रात केली आहे. तसेच चित्रपटावर बंदी न घातल्यास भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

No comments:
Post a Comment